कामवालीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या बॉलीवूड स्टार शायनी अहूजाला आज अंधेरी कोर्टात हजर करण्यात आले. आपण आजारी असल्याचे त्याने न्यायाधीशांना सांगितले.
सुनावणीदरम्यान शायनी शांत होता, यानंतर न्यायाधीशांनी त्याला काही बोलायचे का असा प्रश्न केला असता, आपण आजारी असतानाही न्यायालयात हजर झालो याचा विचार न्यायालयाने करावा अशी विनंती त्याने न्यायालयाकडे केली. यानंतर न्यायालयाने शायनीला 16 जुलै पर्यंत न्यायालयीन कोठेही सुनावली आहे. |