तिसऱ्यांदा रेल्वे बजेट सादर करणाऱ्या रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी अर्थसंकल्पाचे वाचन सुरू केल्यानंतर त्यांना अनेकदा माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांनी अडवल्याने ममता त्यांच्यावर जाम भडकल्या होत्या.
ममतांनी नवीन रेल्वे गाड्या आणि इतर सुविधांची घोषणा केल्यानंतर मध्येच लालू प्रसाद यादव यांनी बिहारवर अन्याय झाल्याचा आरोप करण्यास सुरुवात केली. यावर ममतांनी आणखी पुढे ऐका आणि मग बोला असा सल्ला त्यांना दिला.
यानंतरही दोन ते तीन वेळा लालूंनी ममतांची अडवणूक केल्याने ममता जाम भडकल्या, आधी आपण बोला मग मी बोलते असे लालूंना सुचवत त्या आपल्या खुर्चीवर जाऊन बसल्या. अध्यक्ष मीरा कुमार यांनी मध्यस्थी करत लालूंना बसण्याची विनंती केली आणि पुन्हा ममतांनी आपल्या भाषणास सुरुवात केली. |