रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी वर्ष 2009-10 चा रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना सर्व रेल्वे विभागांसाठी ‘जनता खाना’ (जनभोजन) योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत राष्ट्रीय व प्रादेशिक भोजन पुरविले जाणार आहे. बंगालच्या रेल्वे प्रवाशांसाठी माछ-भात, बिहारच्या प्रवाशांसाठी लिट्टी-चोखा तर दक्षिण भारतातील प्रवाशांना वडा-साम्बर व इडली-डोसा पुरविला जाणार आहे.
बजेट सादर करताना ममता म्हणाल्या, की रेल्वेगाड्यांमध्ये राष्ट्रीय व प्रादेशिक व्यंजन उपलब्ध करून दिले जाणार आहे. लोकांना गुणवत्तापूर्ण भरपूर भोजन उपलब्ध करून देण्यास प्राथमिकता असणार आहे. यासोबतच रेल्वे गाड्या व स्टेशन्सवर पेयजल आणि शौचालयांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. |