माकपाच्या केरळ युनिटमधील प्रमुख नेत्यांमध्ये असलेले अंतर्गत गटबाजी आणि मतभेद दूर करण्यासाठी पार्टी पोलिट ब्यूरोची येथे बैठक सुरू झाली आहे. असे असले तरीही या बैठकीस प.बंगालचे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य सहभागी झालेले नाही.
दोन दिवसांच्या या बैठकीत पक्षाचे महासचिव प्रकाश करात, एस. रामचंद्रन पिल्लई, विमान बोस, व्ही.एस. अच्युतानंदन आणि पी. विजयन आदी सहभागी झाले होते. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य हे या बैठकीत सहभागी झालेले नाही.
पक्षाची ही दोन दिवसीय विशेष बैठक मुख्यमंत्री अच्युतानंदन आणि राज्य सचिव विजयन यांच्यातील खुल्या मतभेदाच्या पार्श्वभूमीवर होत आहे. |