रेल्वे अर्थसंकल्पात उत्तर प्रदेशची उपेक्षा करण्यात आल्याचा आरोप उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी केला आहे. बजेटमध्ये गरीब आणि मागासवर्गीयांना कुठलीही सवलत देण्यात आली नसल्याचा आरोप करतानाच उत्तर प्रदेशबाबत केंद्र सरकारने दुजाभाव केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मुख्यमंत्री मायावती म्हणाल्या, की केंद्र सरकारने उत्तर प्रदेश संदर्भातील आपले धोरण बदलण्याची गरज आहे. या बजेटमध्ये गरीबांना भाड्यात केवळ 1 रुपयांची सूट देण्यात आली असून उच्च श्रेणीच्या भाड्यात दो फीसदी टक्क्यांची सूट देण्यात आली आहे. मॉडेल स्टेशन म्हणून निर्मिती करण्यात येणा-या 375 स्टेशन्समध्ये उत्तर प्रदेशच्या स्टेशन्सची संख्या नगण्य असल्याचा आरोपही त्यांनी केला असून सुविधा देण्याच्या योजनेत अलाहाबाद, मेरठ, गोरखपुर, फैजाबाद, बरेली आणि झाशी या स्टेशन्सचा समावेश न करण्यात आल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. |