आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » राष्ट्रीय » देशातील ४० स्वायत्त विद्यापीठे दर्जाहीन (Over forty private universities below standard: HRD report)
Feedback Print Bookmark and Share
 
ND
ND
देशातील चाळीस विद्यापीठे स्वायत्ततेचे निकष पूर्ण करत नसल्याने त्यांचा स्वायत्त दर्जा काढून घ्यावा अशी शिफारस मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नेमलेल्या एका उच्चस्तरीय समितीने केली आहे.

या समितीने केलेल्या अभ्यासात केवळ ३८ विद्यापीठे स्वायत्ततेचे निकष पाळत असल्याचे निदर्शनास आले. पण चाळीसहून अधिक विद्यापीठांनी या निकषांना हरताळ फासल्याचेही दिसून आले. ४४ विद्यापीठांमध्ये काही सुधारणा घडवून आणल्यास त्यांचा स्वायत्त दर्जा चालू ठेवण्यास हरकत नसल्याचे या समितीचे म्हणणे आहे.

प्रा. एम. अनंतकृष्णन, प्रा. मृणाल मिरी, प्रा. गोविंदन मेहता, प्रा. पी. एन. टंडन यांच्या समितीने हा अहवाल तयार केला. १२६ स्वायत्त विद्यापीठांच्या सादरीकरणाच्या आधारे हा अभ्यास करण्यात आला.

यातील अनेक विद्यापीठात शिक्षकांची गुणवत्ता, सोयी सुविधा यांत अनेक कमतरता जाणवल्या. त्यामुळे या विद्यापीठांनी विशिष्ट कालमर्यादेत आपल्या गुणवत्तेत सुधारणा न केल्यास त्यांचा स्वायत्ततेचा दर्जा काढून घेऊन पुन्हा महाविद्यालयांचाच दर्जा द्यावा अशी शिफारस या समितीने केली आहे.
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: स्वायत्त विद्यापीठे