गुजरातमधील राजकोट जिल्ह्यातील जामकांदोरना तालुक्यात काल रात्री उशीरा झालेल्या बस अपघातात सहा ठार तर 30 जण जखमी झालेत. बस दरीत कोसळल्याने अपघात झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घाटातील एका वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. प्रवासी जामनगरवरून जूनागडकडे येत होते.