जयपूरच्या सीतापूरा औद्योगिक वसाहतीतील इंडियन ऑईल डेपोला गुरूवारी सायंकाळी साडेसात वाजेपासून लागलेल्या आगीने विक्राळ रूप धारण केले असून सैन्य आणि मथुरा रिफाइनरीहून आलेले तज्ज्ञही आगीच्या भीषणतेमुळे तेथपर्यंत पोचू शकलेले नाही. त्यामुळे डेपोत अडकलेल्या कर्मचा-यांचे काय झाले याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
डेपोत घटनेच्या वेळी कार्यरत असलेले अधिकारी आणि कर्मचारी बाहेर निघू शकले किंवा नाही हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. तसेच त्यांची निश्चित संख्याही कळू शकलेली नसल्याने सर्वत्र तणावाचे वातावरण आहे.