आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » राष्ट्रीय » मनसेच्‍या 'गुडबूक'मध्‍ये अमिताभला एन्‍ट्री
Feedback Print Bookmark and Share
 
बॉलीवुड महानायक अमिताभ बच्चनवर वर्षभरापूर्वी नाराज असलेल्‍या महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेने आता आपल्‍या गुडबूकमध्‍ये बिग बीचा समावेश केला असून हरिश्‍चंद्राची फॅक्टरी या मराठी चित्रपटाला ऑस्करमध्‍ये हवी ती सर्व मदत करण्‍याची तयारी अमिताभने दाखविल्‍यानंतर मनसेचा अमिताभकडे पाहण्‍याचा दृष्‍टीकोण बदलला आहे.

अमिताभ यांनी नुकतीच चित्रपटाचे दिग्दर्शक परेश मोकाशी यांना सर्वतोपरी मदत देण्‍याचे आणि त्याच्‍या प्रचार-प्रसारात मदतीचे आश्‍वासन दिले आहे.

हा चित्रपट दादासाहेब फाळके यांच्‍या ‘राजा हरिशचंद्र’ या पहिल्‍या चित्रपटाच्‍या निर्मितीवर आहे. ऑस्करसाठी भारताकडून या चित्रपटाची निवड झाली आहे.

मनसेचे महासचिव शिरीष पारकर यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना अमिताभ यांच्‍या भूमिकेचे कौतुक केले आहे.

गेल्‍या वर्षी सप्‍टेंबरमध्‍ये राज ठाकरे विरुध्‍द अमिताभ बच्‍चन असा वाद बराच रंगला होता.
संबंधित माहिती शोधा