आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » राष्ट्रीय » जयपूर आगीतील मृतांना 10 लाखांची मदत
Feedback Print Bookmark and Share
 
जयपूरच्‍या सीतापूरा येथील इंडियन ऑयल डेपोला लागलेल्‍या आगीतील मृतांसाठी इंडियन ऑयल कॉर्पोरेशनने प्रत्येकी 10 लाख रुपयांच्‍या मदतीची घोषणा केली आहे.

या घटनेत ठार झालेल्‍या मृतांच्‍या नातेवाईकांना इंडियन ऑयलकडून 10-10 लाख रुपये तर गंभीर जखमी झालेल्‍यांना प्रत्येकी दोन लाख रुपये दिले जाणार आहेत.

दरम्‍यान, गुरुवारी सायंकाळपासून लागलेली आग 24 तासांपेक्षा जास्‍त कालावधी उलनटूनही अद्याप नियंत्रणात आलेली नाही. या आगीत सहा जण ठार तर 150 पेक्षा जास्‍त जण जखमी झाले आहेत.
प्रशासनाने दक्षता म्हणून पाच किलोमीटरपर्यंतचा भाग रिकामा केला आहे. या आगीमुळे परिसरातील 10 कि.मी. भागातील लोकांना श्‍वसनाची अडचण जाणवण्‍याची शक्यता आहे.
संबंधित माहिती शोधा