आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » राष्ट्रीय » पीएम ताफ्यामुळे रुग्णाचा वाटेतच मृत्यू
Feedback Print Bookmark and Share
 
चंदीगढमध्‍ये पंतप्रधानांच्‍या दौ-यासाठी करण्‍यात आलेल्‍या सुरक्षा बंदोबस्‍तामुळे आणि त्‍यांच्‍या गाड्यांच्‍या ताफ्यात अडकल्‍याने वेळेवर उपचार होऊ न शकल्‍याने एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सुमीत प्रकाश वर्मा नावाच्‍या या व्‍यक्तीला पंतप्रधानांच्‍या गाड्या जात असल्‍याने वेळेवर रुग्णालयात नेता आले नव्‍हते.

सुमीतच्‍या कुटुंबीयांनी या संदर्भात दिलेल्‍या माहितीनुसार सुमीतला उपचारासाठी चंदीगढच्‍या पीजीआय रुग्णालयात नेले जात होते. मात्र त्‍याच दरम्‍यान पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांच्‍या गाड्यांचा ताफा जात होता. त्‍यामुळे रस्‍त्‍यावर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

या प्रकरणावर पंतप्रधान कार्यालयाने दुःख व्‍यक्त केले असून स्थानीय प्रशासनाकडून या संदर्भात अहवाल मागविण्‍यात आला आहे.
संबंधित माहिती शोधा