आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » राष्ट्रीय » कसाबला सोडवण्‍यासाठी इस्‍त्रायल राजदूतावर दबाव
Feedback Print Bookmark and Share
 
मुंबई हल्‍ल्‍याच्‍या वेळी नरीमन हाऊसमध्‍ये ओलीस ठेवलेल्‍या यहुदी नागरिकांना सोडविण्‍याच्‍या बदल्‍यात अटक करण्‍यात आलेल्‍या आमीर अजमल कसाबला सोडण्‍याची मागणी दहशतवादी संघटनेच्‍या नेत्यांनी अमेरिकेतील इस्रायली राजदूताकडे केल्‍याची माहिती समोर आली आहे.

मुंबई हल्‍ल्‍याची सुनावणी करीत असलेल्‍या विशेष न्‍यायालयात याबाबत कार्यवाही दरम्‍यान दहशतवादी आणि इस्‍त्रायली राजदूत यांच्‍यात झालेल्‍या दूरध्‍वनी चर्चेची रेकॉर्ड उपलब्‍ध करून देण्‍यात आली आहे. त्यात हा खुलासा करण्‍यात आला आहे.

दहशतवाद्यांनी नरीमन हाऊसमध्‍ये ओलीस ठेवलेल्‍या यहुदी नागरिकांना सोडण्‍यासाठी त्‍या बदल्‍यात कसाबला सोडण्‍यात यावे आणि त्‍यासाठी अमेरिकेतील इस्‍त्रायली राजदूतांनी भारतावर दबाव टाकावा अशी मागणी केली होती.
संबंधित माहिती शोधा