जयपुरमधील सीतापुरा औद्योगिक क्षेत्रात इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी) डेपोला लागलेली आग अद्यापही अनियंत्रितच आहे. सलग सहा दिवसांपासून ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असून, शासनाला आणि सैन्याला यात अपयश आले आहे.
पेट्रोल आणि डिझेलची गळती झाल्यानंतर डेपोत 29 ऑक्टोबरला ही आग लागली होती. सलग 11 टँकरला ही आग लागल्यानंतर परिसरातील अनेकांना स्थलांतरित करण्यात आले असून, अनेक कंपन्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे.
या भागातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला असून, पाच किलोमीटर परिसरात कोणतेही इलेक्ट्रिकचे काम करण्यास मनाई करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कुलदीप राका यांनी दिली आहे.