राजधानीतील नॅशनल डिफेंस कॉलेजवर दहशतवाद्यांनी हल्ला करण्याची तयारी केल्याचा खुलासा अमेरिकी गुप्तचर संस्था एफबीआयने केला आहे. काही दिवसांपूर्वी एफबीआयने अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांनी ही माहिती दिल्याचे संस्थेचे म्हणणे आहे.
अमेरिकी नागरिक हॅडली आणि कॅनडाई पण मूळ पाकिस्तानी नागरिक असलेल्या तहव्वुर राणा यांना एफबीआयने अटक केली असून, त्यांच्या चौकशीत ही माहिती समोर आली आहे.
डेनमार्क येथील काही महत्त्वाचे केंद्र आणि राजधानी दिल्लीतील नॅशनल डिफेंस कॉलेजवर दहशतवाद्यांनी हल्ला करण्याची योजना आखल्याचे एफबीआयने न्यायालयात स्पष्ट केले आहे.