डोंबिवलीजवळ गांधीधाम एक्सप्रेसच्या 12 बोग्या रूळावरून घसरल्याने 12 जण जखमी झाले आहेत. जखमींना कल्याणच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही ट्रेन गांधीधामपासून बंगळुरूला जात होती. यात्रेकरूंना एका विशेष ट्रेनने बंगळुरूला रवाना करण्यात आले आहे. या अपघातामुळे दिवा−वसई मार्गावरील रेल्वेसेवा खंडित झाली आहे. मात्र लोकल व्यवस्था सुरळीत सुरू होती.