श्रीनगरजवळ दोन दहशतवाद्यांना जंगली अस्वलाने ओरबाडून ठार केल्याची घटना सोमवारी रात्री घडल्याचे उघडकीस आले असून छिन्नविछन्न अवस्थेत असलेल्या या दहशतवाद्यांजवळ एके 47 रायफलशिवाय दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे.
येथील दोघाघाटी भागात घडलेली अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे.
दक्षिण काश्मीरच्या दामदालोनारमध्ये एका अस्वलाने दोघा दहशतवाद्यांना ठार केले. दोघे दहशतवादी दहशतवादी संघटना हिज्बफल मुजाहीद्दीनचे कमांडर होते. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची नावे कैसर आणि सैफुल्ला अशी आहेत. दोघांकडे एके 47 असूनही अस्वलाने त्यांना प्रत्युत्तराची संधी दिली नाही.