गेल्या वर्षी 26 नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेला हल्ल्याचे षडयंत्र पाकमध्ये रचले गेले असल्याचे स्पष्ट करतानाच विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी यासाठी दहशतवादी आणि त्यांचे पाकमधील म्होरके यांच्यातील संभाषण पुरावा म्हणून सादर केले आहे.
या संदर्भात विशेष न्यायालयाबाहेर बोलताना निकम म्हणाले, की न्यायालयाने हल्ल्या दरम्यान नरीमन हाउसमध्ये लपलेल्या दहशतवादी आणि त्यांचे पाकमधील म्होरक्यांचे संभाषण मंगळवारी ऐकले. त्यावेळी पाकिस्तानातून दहशतवाद्यांना एका खाजगी वृत्तवाहिनीचा नंबर देण्यात येऊन माध्यमांच्या मदतीने भारताकडे आपल्या मागण्यांसाठी दबाव निर्माण करण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही निकम यांनी सांगितले.