आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » राष्ट्रीय » न सांगता अनेक परदेश दौरे केल्‍याची कोडांची कबुली
Feedback Print Bookmark and Share
 
मिळकतीपेक्षा जास्‍त संपत्ती गोळा केल्‍या प्रकरणी अडचणीत सापडलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांनी आपण मुख्‍यमंत्री असताना कुठलीही सूचना न देता आपल्‍या खर्चाने अनेक परदेश दौरे केल्‍याची कबुली दिली आहे.

दरम्‍यान, कोडा यांच्‍या चौकशीसाठी प्रवर्तन निर्देशालयाचे चौकशी पथक दिल्लीतून रांचीकडे रवाना झाले आहे. सध्‍या कोडा रुग्णालयात असले तरीही त्यांनी यापूर्वी दिलेल्‍या कबुली जबाबात मुख्‍यमंत्री पदाच्‍या कार्यकाळात स्‍वखर्चाने अनेकदा दुबई आणि बँकॉकचा दौरा केला आहे. मात्र या दौ-याबाबत सरकारला कुठलीही माहिती दिली नाही. अशी माहिती देणे सर्व मंत्र्यांना बंधनकारक आहे.

कोडा यांनी आपल्‍या या दौ-याचे कारण मेडिकल चेकअप असे सांगितले आहे.

दरम्‍यान, प्रवर्तन निर्देशालयाने आपल्‍या परवानगी शिवाय कोडा यांना डिस्‍चार्ज न करण्‍याचे आदेश अपोलो हॉस्पिटल व्‍यवस्‍थापनाला दिले आहेत.
संबंधित माहिती शोधा