उत्तर प्रदेशातील शहरांमध्ये उभारल्या जात असलेल्या पार्कमध्ये मुख्यमंत्री मायावती आणि इतर दलित नेत्यांच्या पुतळा उभारणीस सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या बंदीच्या उल्लंघनाबद्दल राज्याचे मुख्य सचिव अतुलकुमार गुप्ता यांनी माफी मागितली असून आज न्यायालयात हजेरी लावली आहे.
न्यायमूर्ती एच.एस. बेदी आणि न्या. जे.एम. पांचाल यांच्या पीठाने या संदर्भातील पुढील सुनावणीस मुख्य सचिवांना सुट दिली असली तरीही मुख्य सचिवांनी या संदर्भात दाखल केलेल्या प्रतिज्ञा पत्रात न्यायालयाच्या अवमानाबद्दल माफी मागितली आहे.