नवी दिल्ली, बुधवार, 4 नोव्हेंबर 2009( 15:14 IST )
पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांच्या चंदीगड दौ-या दरम्यान गाड्यांच्या ताफ्यामुळे वेळेवर उपचार न मिळालेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले असून मृत सुमीत वर्मा यांच्या कुटुंबीयांना याबाबतचे पत्र पाठवून त्यांचे सांत्वन केले आहे.
पंतप्रधान चंदीगढच्या दौ-यावर असताना त्यांच्या गाड्यांचा ताफा जात असताना सुरक्षा यंत्रणांनी रस्त्यावरील वाहतूक थांबवली होती. परिणामी वाहतुकीची कोंडी होऊन सुमीत वर्मा हा रुग्ण वेळेवर रुग्णालयात जाऊ न शकल्याने मरण पावला. या प्रकरणानंतर गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाला आहे.
या प्रकरणी स्वतः पंतप्रधानांनी हस्तक्षेप करून या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. तर सुरक्षा यंत्रणांना अधिक संवेदनशील राहण्याचे निर्देश दिले आहेत.