झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांचे रांचीतील घर आणि त्यातील अनेक वस्तू आयकर विभागाने सील केल्या आहेत. चौकशीसाठी यांना जप्त करण्यात आले आहे.
आयकर विभागाने कोडा यांच्या आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या घर आणि कंपन्यांवर मागील आठवड्यात छापेमारी केली होती. 70 जागांवर केलेल्या या छापेमारीत अब्जावधीची बेहीशोबी मालमत्ता आढळून आली असून, कोडा यांच्या नावावर चार हजार कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे.