आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » राष्ट्रीय » जाफरींनी मागितली मदत, मोदींनी दिल्या शिव्या!
Feedback Print Bookmark and Share
 
गुजरात दंगल प्रकरणी अनेक प्रकरणात आरोपी असलेल्या मुख्यमंत्री नरेंद्र मोदीवर आणखी एक गंभीर आरोप झाल्याने ते पुन्हा अडचणीत आले आहेत. गुबलर्ग सोसायटीत झालेल्या दंगली प्रसंगी माजी खासदार एहसान जाफरी यांनी त्यांच्याकडे मदत याचना केली असता मोदींनी त्यांना शिव्या दिल्याचा आरोप एका साक्षीदाराने केला आहे.

28 फेब्रुवारी 2002 मध्ये गुलबर्ग सोसायटीत ही घटना घडली होती. जाफरी यांना काही जणांनी त्यांच्याच घरात जिवंत जाळले होते. या प्रकरणी मुख्य साक्षीदार असलेल्या इम्तियाज याने दंगलींची चौकशी करणाऱ्या समितीला ही साक्ष दिली असून, जाफरी यांनी फोनवरून मोदींकडे मदत मागितली असता मोदींनी त्यांना शिव्या दिल्याचे त्याचे म्हणणे आहे.
संबंधित माहिती शोधा