मध्य प्रदेशातील प्रसिद्ध खजुराहो पाहिल्यानंतर चिनी प्रवासी ह्यूएन त्संग याने खजुराहोला आणखी एक नाव दिले होते. त्याने या लेण्यांना चिनी भाषेत 'ची ची तू' हे नाव दिले. उज्जैनचीही त्याने स्तुती केली होती.
खजुराहोत बौद्ध भिक्षुकाने महत्त्वाचे स्थान होते. या लेण्यांमध्ये दहा बौद्ध मठ होते असा उल्लेखही त्याने आपल्या प्रवास वर्णनात लिहिला आहे.
खजुराहोत एक ब्राह्मण राजा राज्य करत होता, त्याने अनेक धर्मीयांना आश्रय दिल्याचे त्संगने म्हटले आहे.
खजुराहोत अनेक मंदिरही होती परंतु 1494 मध्ये सिकंदर लोधीच्या सैन्याने यातील अनेक मंदिरं पाडल्याचे गॅझेटमध्ये आढळून येते.