जयपूरच्या सीतापुरा औद्योगिक वसाहतीत इंडियन ऑईलच्या डेपोला लागलेली आग तब्बल आठ दिवसांनंतरही पूर्णपणे विझलेली नाही. डेपोतील एका टाकीतून अजूनही धूर येताना दिसतो आहे. या अपघातामुळे बंद पडलेली जयपूर- सवाई माधोपूर रेल्वे मार्गावरील वाहतूक आज कशीबशी सुरू झाली.
या डेपोच्या पाचशे मीटर परिसरातील शिक्षण संस्थांमधील कामकाज ९ नोव्हेंबरपासून सुरू होईल. या आगीमुळे परिसरातील लोकांना डोळ्यात जळजळ, श्वास घ्यायला त्रास होतो आहे. त्यासाठी शिवदासपुरा येथील आरोग्य केंद्रात तपासणी कक्ष सुरू करण्यात आला आहे. तिथे निःशुल्क तपासणी होत आहे.