नवी दिल्ली , शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2009( 11:34 IST )
भारतात हल्ल्याचा कट आखणार्या लष्कर ए तोयबाच्या अटक केलेल्या अतिरेक्यांना पाकिस्तानातून फूस मिळते आहे, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी केला आहे.
अमेरिकेत तोयबाच्या डेव्हिड हेडली आणि तहाव्वूर राणा या दोन अतिरेक्यांना एफबीआयने अटक केली आहे. कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी नवी दिल्लीतील संरक्षण महाविद्यालय आणि दोन बोर्डिंग स्कूलवर हल्ला करण्याचा कट असल्याचे सांगितले. शिवाय पंचतारांकित हॉटेलांवरही ते हल्ला करणार होते. या सगळ्या प्रकारात पाकिस्तानचाही हात आहे. कारण यातील हेडलीने अनेकदा पाकिस्तानला भेट दिली आहे, असे चिदंबरम यांनी म्हटले आहे. एफबीआयने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानमध्ये दोघांना अटकही करण्यात आली आहे.
पाकमध्ये राहून भारतात कारवाया करणार्या अतिरेक्यांसंदर्भात पाकिस्तान किती गंभीर आहे हेच दिसून आले आहे.