कर्नाटक भाजपमध्ये बंडखोरी करत मुख्यमंत्री बी एस येदुयुरप्पा यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या रेड्डी बंधुंपुढ्यात अखेर पक्षाने लोटांगण घातले आहे.
येदुयुरप्पांचे मुख्य सचिव व्ही पी बालिगर यांची बदली करण्यात आली असून, रेड्डी बंधूंची ही मागणी मान्य करण्यात आली आहे.
बालिगर यांना आता उद्योग आणि वाणिज्य विभागाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. रेड्डी बंधूंनी बालिगर यांना हटवण्याची मागणी केली होती. यानंतर राज्य सरकार अस्थिर झाले होते.
रेड्डी बंधूंनी येदुयुरप्पा यांनाही हटवण्याची मागणी केली होती, परंतु पक्षाने त्यांची ही मागणी फेटाळली आहे.