झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांच्या अटकेची तयारी पूर्ण झाली असून आयकर विभागाने कोडा यांचे आणि त्यांच्या सहका-यांचे स्वीस बँकेतही खाते असल्याची माहिती समोर आल्याचा दावा केला आहे. कोडा यांच्या घरातून या संदर्भात काही कागदपत्रे आढळून आली आहेत.
या संदर्भात आधिकारिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयकर विभागाला कोडा यांच्या घरी त्यांच्या स्वीस बँकेतील खात्या संदर्भात माहिती मिळाली असून या संदर्भातील कागदपत्रे अंमलबजावणी संचलनालयाकडे सोपविले जाणार आहेत. कोडा यांचे आणि त्यांच्या सहका-यांचे स्वित्झरलँड व्यतिरिक्त थायलँड आणि मॉरीशस या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर काळा पैसा जमा आहे.