कांगडा जिल्ह्याच्या हरिपूर क्षेत्राजवळ प्रवाशांनी भरलेल्या बसचा ताबा सुटल्याने बस दरीत कोसळून 30 जण ठार तर 48 जण जखमी झाले आहेत.
पोलीस अधीक्षक अतुल फुलझेले यांनी दिलेल्या माहितीनुसार चालकाचा ताबा सुटल्याने बस सुमारे 100 फुट खोल दरीत कोसळली बस नगरोटा सूरियाँ येथून देहरा येथे जात होती.
जखमींना टांडा येथील डॉ.राजेंद्र प्रसाद मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.