आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » राष्ट्रीय » कर्नाटक भाजपमधील पेचप्रसंग कायम
Feedback Print Bookmark and Share
 
PR
PR
भाजपशासित कर्नाटकातील नेतृत्वबदलाच्या मागणीने उत्पन्न झालेला पेचप्रसंग मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. पर्यटनमंत्री जनार्दन रेड्डी यांनी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना हटविण्यासंदर्भात आपली भूमिका कायम ठेवली आहे, तिकडे युडीयुरप्पा मात्र वाद मिटल्याचे सांगत आहेत.

येडीयुरप्पांनी आपणच मुख्यमंत्रिपदी रहाणार असल्याचे सांगून आता कोणताही वाद राहिला नसल्याचे सांगितले. पण लगेचच तिकडे रेड्डी यांनीही पत्रकार परिषद घेऊन आपण आपल्या मागणीवर कायम असल्याचे सांगितले. पक्षहितास्तव, राज्याच्या हितासाठी आणि कार्यकर्त्यांची इच्छा लक्षातघेऊन पक्ष नेतृत्व योग्य आणि अचूक निर्णय घेईल, अशी आशा रेड्डी यांनी व्यक्त केली.

नेतृत्वबदलासंदर्भात समझौता झाल्याचे वृत्त फेटाळून लावत येडीयुरप्पा यांना हटविण्याच्या मागणीवर आपण अजूनही कायम आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
संबंधित माहिती शोधा