आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » राष्ट्रीय » ...आणि येदीयुरप्‍पांना रडू कोसळले!
Feedback Print Bookmark and Share
 
मंत्रिमंडळातील सहका-यांचे बंड, स्‍वपक्षीय विरोधी आमदारांचे राजीनामे आणि त्‍यामुळे पक्ष नेतृत्‍वाकडून निकटवर्तीयांची होत चाललेली उचलबांगडी यामुळे व्‍यथित झालेले कर्नाटक मुख्‍यमंत्री बी.एस.येदीयुरप्‍पा यांना आज रडू कोसळले.

गेल्‍या काही दिवसांपासून त्‍यांनी आपल्‍या भावनांवर नियंत्रण ठेवले होते. मात्र त्‍यांच्‍या मंत्रिमंडळात सहभागी असलेल्‍या आणि त्‍यांच्‍या निकटवर्तीय समजल्‍या जाणा-या शोभा करंदलाजे आणि प्रमुख सचिव बालिगर यांना पदावरून दूर करण्‍यात आल्‍याने त्यांनी अश्रुंना वाट मोकळी करून दिली. त्‍यांना हा निर्णय पक्ष नेतृत्वाच्‍या दबावाखाली घ्‍यावा लागला आहे.

दरम्‍यान, येदीयुरप्‍पा यांनी आपण पक्ष नेतृत्वाशी चर्चा करीत असून सर्व अडचणी सोडवून आणि सर्वांना विश्‍वासात घेऊन पक्षाचा कार्यकाळ पूर्ण करू असा विश्‍वास व्‍यक्त केला आहे.
संबंधित माहिती शोधा