'भारताची हुर्रियतशी चर्चा पाकच्या सहभागाशिवाय अपूर्ण'
भारत सरकार आणि जम्मू-काश्मीरमधील फुटीरवादी नेत्यांमधील चर्चा पाकिस्तानला सहभागी करून घेतल्याशिवाय होऊच शकणार नाही, असा दावा पाकचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी केला आहे.
मुलतानमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की भारत आणि जम्मू-काश्मीरमधील फुटीरवाद्यांमधील कुठलीही चर्चा पाकिस्तानच्या सहभागा शिवाय यशस्वी होऊ शकत नाही.
फुटीवाद्यांनी केंद्र सरकारशी चर्चा करण्यासाठी आपल्या सर्व नेत्यांचे मत जाणून घेण्यास सुरूवात केली असतानाच पाककडून हे वक्तव्य समोर आले आहे.