आत्मसमर्पण करणा-या नक्षलवाद्याला त्याच्या पूनर्वसनासाठी सहा लाख रूपये देण्याची घोषणा छत्तीसगढ सरकारने केली असून अधिकाधिक नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्याचे गृहमंत्री ननकी राम कंवर यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार नक्षलवाद्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी सरकारने ही योजना बनविली असून त्यानुसार राज्य सरकार तीन लाख तर केंद्र सरकार तीन लाख रुपये आत्मसर्मपण कराणा-या नक्षलवाद्याला देणार आहे. तर ए. के. 47 सोबत सरेंडर होणा-या दहशतवाद्याला 10 लाख रुपये दिले जाणार आहे. या नक्षलवाद्यांना बंद कारागृहा ऐवजी मोकळ्या जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे.
तर पाच वर्षात वागणूक सुधारल्यास पुरस्कार आणि जमीन देऊन त्यांचे व्यवस्थापन केले जाणार आहे. तर नक्षलवाद्यांना मदत देणा-या ग्रामस्थांचेही पूनर्वसन केले जाणार आहे.