आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | फ्लॅशबॅक-26/11 | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » राष्ट्रीय » पंतप्रधान घेणार मंत्र्यांची 'परीक्षा'!
Feedback Print Bookmark and Share
 
केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांची कार्यक्षमता तपासण्याच्या दृष्टीने पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी मंत्र्यांकडून त्यांच्या कामाचा लेखाजोखा अहवाल मागविला. हा अहवाल सादर करण्यासाठी मंत्र्यांना ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सर्व केंद्रीय मंत्र्यांना उद्देशून लिहिलेले पत्र कॅबिनेट सचिव के. एम. चंद्रशेखर यांच्यामार्फत सर्व मंत्र्यांना धाडण्यात आले आहे. प्रत्येक मंत्र्याने पदभार सांभाळल्यापासून कोणते काम केले, याबाबतचा सविस्तर अहवाल ३० नोव्हेंबरच्या आत पंतप्रधानांकडे पाठवून द्यावा. पंतप्रधान स्वतः या अहवालाची पाहणी करणार आहेत, असे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
संबंधित माहिती शोधा