आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | फ्लॅशबॅक-26/11 | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » राष्ट्रीय » जम्मू- काश्मिरात ७०० दहशतवादी सक्रीय!
Feedback Print Bookmark and Share
 
जम्मू-काश्मिरात सध्या ७०० दहशतवादी सक्रीय आहेत आणि घुसखोरी करणार्‍या दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून शस्रे आणि पैसा मिळत असल्याची माहिती, राज्याचे पोलिस महासंचालक कुलदीप खोडा यांनी आज येथे दिली.

खोडा म्हणाले, की राज्यात सध्या जवळपास ७०० दहशतवादी कार्यरत आहेत आणि त्यामध्ये यापूर्वी काही शरण आलेल्या दहशतवाद्यांचाही समावेश असू शकतो. शरणागती पत्करलेल्या दहशतवाद्यांनी पुन्हा शस्रे उचलली आहेत का, या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल ते बोलत होते.

मात्र पुन्हा दहशतवादी संघटनांमध्ये सामील झालेल्यांची संख्या अत्यल्प असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेपलीकडून होणार्‍या घुसखोरीत वाढ झाली आहे का, असे विचारले असता ते म्हणाले, की अलीकडच्या वर्षांमध्ये घुसखोरीचे पुष्कळ प्रयत्न झाले; परंतु त्यांपैकी बरेच प्रयत्न सुरक्षा दलांनी हाणून पाडले. घुसखोरांना शस्रे आणि पैसा पुरविण्यासाठी त्यांनी पाकिस्तानी प्रशासनालाही धारेवर धरले.
संबंधित माहिती शोधा