आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | फ्लॅशबॅक-26/11 | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » राष्ट्रीय » महाराष्ट्रापेक्षा सचिन मोठा नाही- शिवसेना
Feedback Print Bookmark and Share
 
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरवर शिवसेनेने पुन्हा एकदा जहाल टिका केली आहे. मुखपत्र सामनातील एका लेखातून सचिनवर ही बोचरी टिका करण्‍यात आली आहे. सचिन महाराष्ट्रापेक्षा, राज्याच्या अस्मितेपेक्षा मोठा नसल्याचे या लेखात नमूद करण्यात आले आहे.

'मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे, परंतु सर्वप्रथम मी भारतीय असल्याचे' वक्तव्य सचिनने केल्यानंतर सामनातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्याच्यावर जोरदार टिका केली होती. याचे पडसाद देशभर उमटले होते.

आता पुन्हा एकदा शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून कार्यकारी संपादक आणि सेनेचे खासदार संजय राऊत यांनी सचिनवर टिकास्त्र डागले आहे.

सचिन महाराष्ट्राच्या अस्मितेपेक्षा मोठा नाही. तो भगतसिंग किंवा राजगुरू नाही. त्याच्या 17 हजार धावांमुळे मुंबई महाराष्ट्राला मिळालेली नाही. सचिनच्या फटकेबाजी पेक्षा मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून ज्यांनी बलिदान दिले त्यांचे बलिदान आम्हाला महत्त्वाचे असल्याचे राऊत यांनी आपल्या लेखात म्हटले आहे.
संबंधित माहिती शोधा