आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | फ्लॅशबॅक-26/11 | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » राष्ट्रीय » ठाकरेंनी बाबरी पाडलीच नाही- सिंघल
Feedback Print Bookmark and Share
 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आता विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांनी तोंडसुख घेतले आहे. शिवसेनेत दम नसल्याचे सांगतानाच बाळासाहेबांनी बाबरी पाडलीच नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

ठाकरेंमध्ये साहस नाही. ते त्यांच्यात असते तर ते बाबरी पाडण्यासाठी अयोध्येत गेले असते. ते कधी अयोध्येत गेले नाहीत. आणि बाबरी मशीद पाडण्यात त्यांचा अथवा कोणत्याही शिवसैनिकाचा हात नसल्याचे सिंघल यांनी म्हटले आहे.

एकीकडे शिवसेनाप्रमुखांवर टीकेची झोड उडवतानाच दुसरीकडे सिंघल यांनी राज ठाकरे यांच्या धोरणावरही टिका केली. राज आपल्या मुद्द्यांपासून भटकत असून, त्यांना सद्बुद्धी मिळो असेही ते म्हणाले.

वंदे मातरम् हे राष्ट्रीय गीत आहे. याला विरोध करणे चुकीचे असून, देशाचे शत्रूच फक्त याचा विरोध करू शकतात असे सिंघल म्हणाले.
संबंधित माहिती शोधा