भारत आणि चीनमध्ये तेढ वाढावी असा माझा हेतू नसून गेल्या सहा दशकांमध्ये भारत पहिल्यांदाच चीन विरोधात दृढपणे उभा राहिला आहे, असे मत तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी व्यक्त केले आहे.
दलाई लामा यांनी एका मुलाखतीत सांगितले, की भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण निर्माण व्हावे असा आमचा हेतू नसून दोन्ही देशांमध्ये मैत्रिपूर्ण संबंध असावेत असाच आमचा हेतू आहे.