आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | फ्लॅशबॅक-26/11 | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » राष्ट्रीय » याच अधिवेशनात अहवाल सादर करणार- चिदंबरम
Feedback Print Bookmark and Share
 
इंडियन एक्सप्रेसमध्ये लिबरहान आयोगाचा अहवाल प्रकाशित झाल्यानंतर सरकारचे धाबे दणाणले आहेत. लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी रान माजवले असतानाच आता केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांनी याच अधिवेशनात लिबरहान आयोगाचा अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. अहवाल सरकारकडे सुरक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारने संसदेत अहवाल सादर करण्याआधीच अहवाल बाहेर कसा आला असा सवाल विरोधकांनी करत आजच हा अहवाल सादर करण्याची मागणी करत संसदेत गदारोळ सुरू केला आहे.

यानंतर आज चिदंबरम यांनी सरकारची भूमिका मांडली. चालू अधिवेशनातच सरकार अहवाल सादर करणार असल्याचे ते म्हणाले.
संबंधित माहिती शोधा