आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | फ्लॅशबॅक-26/11 | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » राष्ट्रीय » आयोगात वाजपेयींचे नाव नाही?
Feedback Print Bookmark and Share
 
इंडीयन एक्सप्रेसने लिबरहान आयोगातील महत्त्वाच्या बाबींचा खुलासा केल्याने देशभर पुन्हा एकदा बाबरी मशीद प्रकरणी वादंग माजला आहे. आता अहवालात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव नसल्याचा दावा लिबरहान आयोगाचे वकील अनुपम गुप्ता यांनी केला आहे.

बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी आयोगाने अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि अटल बिहारी वाजपेयी यांना दोषी ठरवल्याचे एक्सप्रेसने आपल्या वृत्तात स्पष्ट केले आहे.

यानंतर आज सकाळपासूनच विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले असून, अहवाल संसदेत सादर होण्यापूर्वी लिक कसा झाला असा प्रश्न उपस्थित केला आहे.

यानंतर आयोगाचे वकील अनुपम गुप्ता यांनी एका खाजगी चॅनलला दिलेल्या मुलाखतीत आयोगाने अडवाणींना दोषी ठरवलेच नसल्याचे म्हणत आणखी एक वाद जन्माला घातला आहे.
संबंधित माहिती शोधा