बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

परिस्थिती चिंताजनक

WD
रुपयाची घसरण ही चिंतेची बाब आहे. या आर्थिक संकटाला जागतिक मंदी जितकी जबाबदार आहे, तितक्याच देशातील अंतर्गत बाबीही जबाबदार असल्याचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी संसदेत निवेदन करताना सांगितले.

देशातील आर्थिक मंदीचे संकट लक्षात घेता सरकारकडून यावर उत्तर देणे अपेक्षित असून या संकटपासूनही सरकार लवकरच तोडगा काढेल असा विश्वास पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी संसदेत निवेदन सादर करतेवेळी व्यक्त केला. सिरियातील घडामोडींचा संदर्भ देत त्याचा अप्रत्यक्ष परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत असून कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने रुपया घसरला आहे. रुपयाच्या घसरणीबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. केवळ भारतीय रुपयाची घसरण झालेली नाही, तर ब्राझील, तुर्कस्थानच्या चलनाचीही घसरण झाली आहे. रुपयाची घसरण रोखण्यासाठी आरबीआय आणि सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यासह देशात पेट्रोलियम पदार्थांचा वापर कमी झाला पाहिजे तसेच सोन्याची आयात कमी होणे गरजेचे आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. देशाबाहेर घडणा-या घटनांमुळे रुपयावर परिणाम होत आहे. सीरियामधील संघर्ष, तणाव आणि अमेरिकेने घेतलेली आक्रमक भूमिका, तसेच तेलाच्या किंमतीत झालेली वाढ आणि अमेरिकेचे आर्थिक धोरण या सर्व घटकांचा परिणाम भारतीय रुपयावर झाल्याने रुपयाची घसरण होत आहे.

मात्र आर्थिक सुधारणांसाठी सरकार प्रयत्नशील असून कोणतीही विकासकामे न थांबवता परिस्थिती नियंत्रणात आणणार असल्याचे पंतप्रधानांनी या वेळी सांगितले.पंतप्रधानांनी राज्यसभेत बिकट अर्थव्यवस्था आणि कमकुवत रुपयाबद्दल

निवेदन सादर केले. असता विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. दरम्यान सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये खडाजंगी झाली. गेल्या नऊ वर्षांपासून विरोधी पक्ष संसदेच्या कामकाजात अडथळे आणत आहे, ही गंभीर बाब असल्याचे म्हटले आहे. सध्याच्या देशाच्या आर्थिक स्थितीबद्दल भाजपचे विरोधी पक्षनेते अरूण जेटली आणि इतर काही नेत्यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण मागितले. देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सरकार काय करीत आहे, असा प्रश्न विरोधी पक्षांनी उपस्थित केला. यावर पंतप्रधान मनमोहनसिंग उठले आणि म्हणाले की, आपल्या देशात विरोधी पक्ष पंतप्रधानांना चोर संबोधतात. जगात इतर देशात असे होत नाही. त्यानंतर अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही पंतप्रधानांची बाजू घेतली आणि म्हणाले, विरोधी पक्षांनी पंतप्रधानांच्या वक्तव्या दरम्यान अडथळा आणू नये. विरोधकांनी परिस्थितीची जाण ठेवावी आणि सभागृहाचे कामकाज चालू द्यावे, असे त्यांनी सांगितले. कोळसा घोटाळ्याच्या गायब फाईल्स बद्दल पंतप्रधान म्हणाले की, त्या फाईल्सचा मी रखवाला नाही.

सरकार सोने विकत घेणार !

भारताच्या सध्याच्या आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी शेवटी सरकारला सोन्याचाच विचार करावा लागत आहे आणि या विचाराचा एक भाग म्हणून सरकार सामान्य लोकांकडून सोने खरेदी करून ते विकण्याची योजना आखत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. अशा रितीने सरकार हे सोने खरेदी करून ते सोन्याची विक्री करणा-या मोठ्या व्यापा-यांना उपलब्ध करून देईल आणि देशातले लोक ते सोने पुन्हा विकत घेतील.