मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > प्रादेशिक
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
सेनेचा 'मुंबई'साठी 'बॉम्बे'वर हल्लाबोल
भाषा
राज ठाकरेंच्या महाराष्ट्र ‍नवनिर्माण सेनेने मराठी बाण्याच्या रूंदीकरणासाठी छेडलेल्या आंदोलनानंतर शिवसेनेने मराठी अस्मितेचा झेंडा हाती घेतला असून 'बॉम्बे' शब्द वापरणार्‍या प्रतिष्ठानाविरुद्ध आघाडी उघडताना शाळा व वृत्तपत्रावर हल्लाबोल केला आहे.

पक्षाचे खासदार व मुखपत्र 'सामना'चे संपादक संजय राऊत यांच्या स्तंभलेखनाने प्रेरित झालेल्या पक्षकार्यकर्त्यांनी टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राची पुरवणी 'बॉम्बे टाइम्स'च्या प्रति जाळल्या. आझाद मैदान पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने अनोळखी व्यक्तींनी टाइम्सच्या कार्यालयाबाहेर बॉम्बे टाइम्ससहित वृत्तपत्राच्या प्रती जाळल्याचे सांगितले.

मध्य मुंबईतील माहीम येथील बॉम्बे स्कॉटिश स्कूल येथील प्रवेशद्वारावरील तीन फलकांची मोडतोड करून 'बॉम्बे' शब्दाविरूद्धच्या आंदोलनास सुरूवात झाली. फलकावरील 'बॉम्बे' शब्दास काळे फासण्यात आले.

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेही याच शाळेत शिकतात, हे मात्र त्या कार्यकर्त्यांना माहीत नसावे. बॉम्बेचे काही वर्षापूर्वीच 'मुंबई' असे नामकरण करण्यात आले असताना 'बॉम्बे' शब्द वापरणे मराठी अस्मितेसविरूद्ध बंड पुकारण्यासारखे असल्याचे राऊत यांनी स्तंभास भूमिका मांडली आहे.
आणखी
राज यांचा नोटीस स्वीकारण्यास नकार
भवरलालजी जैन यांचा पद्मश्रीने गौरव
राज यांना मुंबई पोलिसांची नोटीस
महाराष्ट्र सरकार डरपोक आहे- आझमी
नाशिक मधील अपघातात सात ठार
आता आबांच्या राजीनाम्याचे 'राज'कारण!