मुंबई- आग्रा महामार्ग दिवसें-दिवस वाहतुकीसाठी घातक बनत चालला असून, आज ट्रक आणि मारुती ओमनी यांच्यात झालेल्या अपघातात तीन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये समाधान गावडे, सुनीत गावडे, साहेबराव शेवाळे, या तिघांचा समावेश आहे. हे चौघेही धुळ्याकडून नाशिककडे येत असताना त्यांच्या कारला अपघात झाला.
|