मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > प्रादेशिक
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
अंनिसची शासनाला अभिवन 'थप्पड'  Search similar articles
गेल्या 10 वर्षांपासून प्रलंबित असलेले जादूटोणा विरोधी विधेयक मंजूर करण्याबाबत शासनाच्या उदासीनतेच्या निषेधार्थ येथील म. फुले वाड्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे अभिवन आंदोलनाद्वारे सरकारचा निषेध करण्यात आला. राज्यात जादूटोणा करणा-या प्रवृत्तींना आळा बसावा आणि अज्ञानी व अशिक्षित सर्वसामान्यांची दिशाभूल थांबावी यासाठी महाराष्ट्र

अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे जादूटोणा विरोधी विधेयकाची सातत्याने मागणी केली जात आहे. या मागणीकडे शासनाचे होत असलेले दुर्लक्ष व निष्क्रियता याचा निषेध करण्यासाठी अंनिसने राज्यभर स्वतःलाच थप्पड मारून आंदोलन सुरू केले आहे.

आंदोलनाची सुरुवात अज्ञान व अंधश्रद्धेवर कडाडून प्रहार करणा-या म. फुले यांच्या पुतळ्यापासून करण्यात आली. सकाळी 11 वाजेच्या सुमारास समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी थप्पड मार आंदोलन सुरू केले. दि. 25 पर्यंत हे आंदोलन चालणार राज्यभर आहे.
आणखी
पुण्यात पाणी कपातीचा निर्णय
मराठमोळ्या बनलेल्या मेघालयातील मुली
रत्नागिरीतही होणार साहित्य संमेलन
राज्य विधी मंडळाचे आजपासून अधिवेशन
एन्काउंटर फेम दया नायक पुन्हा अडचणीत
हनुमानाच्या मंदिरात चमत्कार