शिर्डीत साई मंदिरात गुरूपौर्णिमेनिमित्त तीन दिवसांचा उत्सव आयोजित करण्यात आला असून यानिमित्त मंदिर शुक्रवार (दि.18 रोजी) रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय संस्थानने घेतला आहे.
दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात उत्सवाचे आयोजन करण्यात येत असून त्यासाठी देशभरातून साईभक्तांची मोठया प्रमाणावर उपस्थिती असते. उत्सवानिमित्त मंदिर परिसर सजविण्यात आला असून शिर्डीत भविकांची मोठया प्रमाणावर गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे.
|