महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी पक्षाचे ज्येष्ठ नेते पंतगराव कदम यांची निवड करण्यात आली असल्याची घोषणा शुक्रवारी दुपारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत करण्यात आली. प्रभा राव यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी निवड झाल्याने ही जागा रिकामी होती.
केंद्रात सरकारला 22 रोजी बहुमत सिध्द करावयाचे असून अशा स्थितीत महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष पद रिक्त ठेवणे शक्य नसल्याने ही निवड करण्यात आली आहे. ही निवड तात्पुरती असल्याचेही पक्षातर्फे स्पषष्ट करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत मुकुल वासनिक, माणिकराव ठाकरे, रोहिदास पाटील, शिवाजीराव मोहते यांची नावे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होती.
|