मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > प्रादेशिक
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
राहुल गांधींचा विदर्भ दौरा आटोपता  Search similar articles
शेतक-यांची दुःखे आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कॉग्रेसचे सरचिटणीस खा. राहुल गांधी यांनी विदर्भाच्या दौ-यावर आले असले तरीही केंद्रात संपुआ सरकारला बहुमत सिद्ध करण्यास अवघे 3 दिवस उरले असताना कॉंग्रेस समोर वाढत चाललेल्या अडचणींमुळे त्यांनी आपला दौरा आटोपता घेऊन त्वरित दिल्ली गाठली आहे.

विदर्भात विशेषतः यवतमाळ व वर्ध्यात शेतक-यांच्या आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे. यामागील कारणे जाणून घेण्यासाठी आणि शेतक-यांना धीर देण्यासाठी खा. राहुला गांधी दौ-यावर आले होते. आपल्या अवघ्या एका दिवसाच्या दौ-यात त्यांनी यवतमाळसह वर्धा जिल्ह्यातील गावागावामध्ये जाऊन शेतक-यांशी मोकळी चर्चा केली.

यंदा पाऊस नाही, पेरणी केलेले उगवलेले नाही, कर्ज माफीचे पंतप्रधानांचे पॅकेज अद्याप मिळालेच नाही यासह अनेक समस्या शेतक-यांनी त्यांच्यासमोर मांडल्या. या सर्व समस्या त्यांनी जाणून घेतल्या. मात्र केंद्रात सरकारची झालेली गोची त्यासाठी चाललेली कसरत या पार्श्‍वभूमीवर त्यांनी आपला दौरा आटोपता घेत आनंदवनची भेटही रद्द करून तत्काळ दिल्ली गाठली.
आणखी
प्रकाशाचे राज्य आणखी अंधारात जाणार
मुंबईत शनिवारपासून पाणी कपात
कॉंग्रेस प्रदेशाध्‍यक्षपदी पतंगराव कदम
लता मंगेशकरांना नागपूर विद्यापीठाची डी लिट
जमीर घेणार महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ
राहुल गांधींच्या विदर्भ दौर्‍यास सुरूवात