|
अनेक नादमधुर गीतांनी मराठी मनाला ठेका धरायला लावणारे ज्येष्ठ गायक आणि संगीतकार विठ्ठल शिंदे यांचे शुक्रवारी सकाळी हृदयविकारामुळे निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, मुलगा आणि नातवंडे असा परिवार आहे. विक्रोळी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
|