पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटत आले तरीही राज्यात अद्याप पावसास सुरुवात झालेली नाही. राज्यभर दुष्काळाचे सावट निर्माण झाले असताना राहुरी कृषी विद्यापीठाने शेतक-यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित केल्या आहेत. येत्या दोन महिन्यात राज्यात सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे संकेत कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागातील सूत्रांनी दिली आहे.
कमाल तापमान आणि वा-याचा वेग यामुळे यंदा पाऊस कमी झाला असला तरीही येत्या दोन महिन्यात हे चित्र बदलणार असून राज्यात सरासरीच्या 89 टक्के इतका पाऊस होण्याचे संकेत राहुरी कृषी विद्यापीठाच्या हवामान खात्याने व्यक्त केले आहे.
|