शिवसेनेचे खा.तुकाराम रेंगे-पाटील गेल्या 3 दिवसांपासून भूमीगत झाले असून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मातोश्रीवर घेतलेल्या बैठकीसही ते अनुपस्थित होते. खा.रेंगे यांच्या अनुपस्थितीमुळे ते पक्षातून फुटणार की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. गेल्या 3 दिवसांपूर्वी मुंबईला येण्यासाठी निघालेले खा.रेंगे मुंबईला पोचलेच नसून त्यांच्या कुटुंबीयांच्याही संपर्कात नाहीत.
खा.रेंगे यांच्या शोधासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू असून ते कॉंग्रेसला जावून मिळाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. रेंगे काही दिवसांपासून पक्ष नेतृत्वापासून नाराज होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाचे उल्लंघन करून गेल्या दोन महिन्यांपूर्वी ते नारायण राणे यांच्या मुलाच्या विवाहासही उपस्थित राहिले होते. मुख्यमंत्री विलासराव देशमुखांसह नारायण राणे हे त्यांच्या संपर्कात असल्याने रेंगे शिवसेनेतून फुटले की काय अशी आशंका व्यक्त केली जात आहे.
|