संसदीय लोकशाहीत ऐतिहासिक योगदान असलेल्या महाराष्ट्र विधान परिषदेचा वर्धापन दिन सोमवारी (दि. 21) सकाळी 9.30 ते 11.30 वाजेच्या दरम्यान मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत विधानसभा मध्यवर्ती सभागृहात साजरा करण्यात येत आहे.
सकाळच्या कार्यक्रमात 'लोकशाहीमध्ये वरिष्ठ सभागृहाचे स्थान व जबाबदारी' या विषयावर मुख्यमंत्री विलासराव देशमुख मांडणार आहेत. तसेच विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर, उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते पांडुरंग फुंडकर, सभागृह कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह विधान परिषद सदस्य नितीन गडकरी, दिवाकर रावते, उल्हास पवार, गुरूनाथ कुळकर्णी आदी विचार मांडणार आहेत.
|